नवमहाराष्ट्र विध्यालय खराबवाडी चाकण येथील हिंदी अध्यापक श्री अशोक ठाणगे सर यांना अंतरराष्ट्रीय हिंदी भाषाभूषण पुरस्कार
अखिल भारतीय हिंदी अध्यापक सभा, भारत सरकार व नेपाल सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने काठमांडू (नेपाळ) येथे 1 नोव्हेंबर ते 3 नोव्हेंबर 2022 रोजी होणा-या हिंदी शिक्षक एवं साहित्यकार संमेलन 2022 च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी नवमहाराष्ट्र विध्यालय खराबवाडी चाकण येथील हिंदी अध्यापक श्री अशोक ठाणगे सर यांची केंद्रीय समितीने निवड केली असून त्यांना अंतरराष्ट्रीय हिंदी भाषाभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
यापूर्वी त्यांना गोवा येथे भाषारत्न पुरस्कार व खेड तालुका मुख्याधापाक संघ यांच्या वतीने ही आदर्श हिंदी शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यासाठी खराबवाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश खराबी सचिव गोरक्षनाथ कड सर्व विश्वस्त संचालक मुख्याध्यापक अविनाश कड सर व सर्व अध्यापक बंधू भगिनींनी व कर्मचारी वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.