300 सुविचार

 दैनिक टाचणावर लिहीण्यासाठी 300 अनमोल सुविचार*


सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान
जग प्रेमाने जिंकता येतंशत्रुत्वाने नाही.
यश मिळवायचं असेल तर स्वत: स्वत:वर काही बंधन घाला.
प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.
प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
१०चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
११मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
१२छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
१३आपण जे पेरतो तेच उगवतं.
१४फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
१५उशीरा दिलेला न्याय हा  दिलेल्या न्यायासारखा असतो.
१६शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
१७प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.
१८आधी विचार करामग कृती करा.
१९आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका,
२०फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !
२१एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
२२अतिथी देवो भव 
२३अपयशाने खचू नकाअधिक जिद्दी व्हा.
२४दु: कवटाळत बसू नकाते विसरा आणि सदैव हसत रहा.
२५आपल्यामुळे दुसऱ्याला दु: होईल असे कधीही वागू नका.
२६निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.
२७खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसतेसुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
२८उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.
२९चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.
३०नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
३१माणसाची चौथी मूलभूत गरज म्हण्जे पुस्तक.
३२सत्याने मिळतं तेच टिकतं.
३३जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.
३४परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.
३५हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहेमग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !
३६स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.
३७प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.
३८खरी श्रीमंती शरीराचीबुध्दीची आणि मनाची
३९तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.
४०वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !!
४१जो गुरुला वंदन करत नाहीत्याला आभाळाची उंची लाभत नाही.
४२गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.
४३झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.
४४माणसाचा सगळ्यात मोठा सदगुण म्हणजे त्याची माणुसकी
४५क्रांती हळूहळू घडतेएका क्षणात नाही.
४६सहल म्हणजे माणसिक आनंदाची सामुहिक क्रिडा
४७मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.
४८आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.
४९बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.
५०मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.५१तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
५२शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.
५३मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवाज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.
५४आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.
५५एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
५६परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !
५७खिडकी म्हणजे आकाश नसतं.
५८जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फ़ुलण्यात आहे
५९वाचनमनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.
६०भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते.
६१कविता म्हणजे भावनांचं चित्र!
६२संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
६३तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंचकिंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.
६४ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !
६५स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नकाआणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.
६६अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.
६७तुलना करावी पण अवहेलना करू नये.
६८समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
६९आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
७०मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.
७१चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.
७२व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नकाआहे तो परिणाम स्वीकारा.
७३आवडतं तेच करू नकाजे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
७४तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
७५अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.
७६विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
७७मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.
७८आयुष्यात प्रेम कारा ; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
७९आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
८० प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही.
८१तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.
८२सगळेच निर्णय मनाने घेऊ नकाकाही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.
८३काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं.
८४लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.
८५चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.
८६तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.
८७भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतोभविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.
८८चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
८९आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.
९०उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही
९१पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.
९२अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
९३मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
९४रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय - मौन !
९५अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.
९६अंथरूण बघून पाय पसरा.
९७कधी कधी हक्क मागून मिळत नाहीतते मिळवावे लागतात.
९८तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोलाआणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.
९९अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
१००संकटं तुमच्यातली शक्तीजिद्द पाहण्यासाठीच येत आसताच
१०१सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.
१०२सौंदर्य हे वस्तूत नसतेपाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
१०३शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम 
१०४सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीतकाही सोडून दिले की आपोआप सुटतात.
१०५विद्या विनयेन शोभते 
१०६शीलाशिवाय विद्या फ़ुकाची आहे.
१०७जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
१०८एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.
१०९कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.
११०आयुष्यात खरं प्रेमखरी माया फ़ार दूर्मिळ असते.
१११ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही.
११२कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.
११३देणाऱ्याने देत जावेघेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवसदेणाऱ्याचे हात घ्यावे !
११४आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.
११५मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !
११६ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.
११७जे झालं त्याचा विचार करू नकाजे होणार आहे त्याचा विचार करा.
११८आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
११९रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो.
१२०जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतंपण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम !
१२१लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.
१२२कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.
१२३जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.
१२४पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.
१२५आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.
१२६गुणांचं कौतुक उशीरा होतंपण होतं !
१२७कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.
१२८स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !
१२९ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.
१३०जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार !
१३१सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.
१३२श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.
१३३आनंदी मनसुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.
१३४एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.
१३५प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.
१३६आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र !
१३७आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतातमरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील !
१३८स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.
१३९अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.
१४०हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
१४१आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.
१४२बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?
१४३कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !
१४४टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.
१४५नेहमी तत्पर रहाबेसावध आयुष्य जगू नका.
१४६यश  मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.
१४७आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकतेह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.
१४८खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहेआपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.
१४९जगी सर्व सुखी असा कोन आहेविचारी मना तुच शोधूनी पाहे.
१५०प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नकास्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.
१५१स्वातंत्र्य म्हणजे संयमस्वैराचार नव्हे.
१५२आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.
१५३माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमानस्फूर्ती-निंदालाभ हानीप्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.
१५४जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.
१५५तन्मयता नसेल तरविद्वत्ता व्यर्थ आहे.
१५६शिक्षण हे साधन आहेसाध्य नव्हे.
१५७हसाखेळा पण शिस्त पाळा.
१५८आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.
१५९स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.
१६०तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार !
१६१काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.
१६२काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.
१६३एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.
१६४हे देवामला खूप खूप आव्हानं दे  ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !
१६५उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.
१६६या जन्मावरया जगण्यावर शतदा प्रेम करावे.
१६७तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा....आत्ताच !
१६८केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.
१६९दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.
१७०माणूस म्हणजे गुण  दोष यांचे मिश्रण आहे.
१७१प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.
१७२व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.
१७३काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.
१७४दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नकावाटू शकलात तर आपला आनंद वाटा.
१७५शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने कराक्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.
१७६जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.
१७७दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं.
१७८शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाहीतो स्वतःहून शिकतो.
१७९जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही ते सद्विचाराने चालते.
१८०परिस्थितिला शरण  जाता परिस्थितीवर मात करा.
१८१ऎकावे जनाचे करावे मनाचे.
१८२एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.
१८३केवळ ज्ञान असून उपयोग नाहीते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
१८४बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.
१८५चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.
१८६तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं.
१८७दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.
१८८स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ  देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.
१८९स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.
१९०त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहेनव्हेत्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या !
१९१जगू शकलात तर चंदनासारखे जगास्वतझीजा आणि इतरांना गंध द्या
१९२दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.
१९३पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.
१९४उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.
१९५जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
१९६मरावे परी कीर्तीरूपे उरावे.
१९७आयुष्य जगून समजतेकेवळ ऎकून , वाचून , बघून समजत नाही.
१९८मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.
१९९बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.
२००तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.
२०१गरिबी असूनही दान करतो तो ख्ररा दानशूर.
२०२स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.
२०३प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.
२०४आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.
२०५जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.
२०६सदगुणांना कधीच वार्धक्य येत नाही.
२०७उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.
२०८लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.
२०९मोहाचा पहिला क्षणही पापाची पहिली पायरी असते.
२१०जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते.
२११सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.
२१२जगात सारी सोंगे करता येतातपण पैशाच सोंग करता येत नाही.
२१३संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.
२१४जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.
२१५सौंदर्यसुस्वभाव यांची बेरीज करामैत्रीतून मत्सर वजा कराप्रेमाला शुध्द अंतःकरणाने गुणापरमनिंदेचा लघुत्तम काढासुविचारांचा वर्ग करादयाक्षमाशांतीपरमार्थ यांचे समीकरण सोडवा... हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणित आहे.
२१६क्रांती तलवारीने घडत नाहीतत्वाने घडते.
२१७जो गुरू असेलतो शिष्य असेलचजो शिष्य नसेलतो गुरू नसेल.
२१८जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहेसमुद्र गाठायचा असेलतर खाचखळगे पार करावेच लागतील.
२१९जीवन ही एक जबाबदारी आहेक्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.
२२०वैभव त्यागात असतेसंचयात नाही.
२२१तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास ठेवा.
२२२खोटी टीका करू नकानाहीतर प्रतिटीका ऎकावी लागेल.
२२३मनाविरूध्द गोष्टम्हणजे ह्रदयस्थ परमेश्वराविरूध्द.
२२४पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाहीआपले अंतरंग खुले करतेकधी चुकवत नाही की फसवत नाही.
२२५ह्रदयात अपार प्रेम असंल की सर्वत्र मित्र
२२६टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.
२२७प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेलपण शत्रू निर्माण करू नका.
२२८मनाला आंनद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य.
२२९भव्य विचार हा सुगंधासारखा असतोतो पसरावावा लागत नाहीआपोआप पसरतो.
२३०वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.
२३१त्याज्य वस्तू फूकट मिळाली तरी स्वीकारू नये.
२३२शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येतेपण त्यासाठी संयम असावा लागतो.
२३३कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही.
२३४बनू शकलात तर कृतज्ञ बनाकृतघ्न नको.
१३५दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच आसतो.
२३६ओरडण्याने ओरडणे बंद होत नाहीस्वस्थ राहण्याने मात्र होते.
२३७दुःख गरूडाच्या पावलाने येतं आणि मुगींच्या पावलांनी जातं.
२३८जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.
२३९एकमेका साहय्य करू  अवघे धरू सुपंथ 
२४०सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.
२४१श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही.
२४२राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.
२४३संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
२४४असंभवनीय गोष्टी कधीच खऱ्या मानू नयेत.
२४५उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहेतो म्हणजे रात्र.
२४६ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.
२४७जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतातत्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नही.
२४८पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही.
२४९मनाला आंनदसंस्कार देणारी प्रत्येक वस्तू  कृती कलापूर्ण आहे.
२५०दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो.
२५१आकाशाखाली झोपणाऱ्याला कोण लुटणार ?
२५२जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.
२५३पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत.
२५४आपण परिस्थितीला शरण जाता कामा नयेपरिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.
२५५अंहकार हा तपःसाधनेचा महान शत्रू आहे.
२५६मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून आपला अधःपात करून घ्यावा लागतो.
२५७नैतिक पाया ढासळला की धार्मीकता संपलीच म्हणून समजा.
२५८अंतर्बाह्य प्रांजळपणा हाच प्रीतीचा प्राण होय.
२५९सामर्थ्याच्या पाठीमागे शील हवे.
२६०शहाणपणाचे प्रदर्शन करणारा पोपट कायमचा बंदिवान होतो.
२६१गवताची दोरी वळली म्हणजे तिने मत्त हत्तीसुध्दा बांधला जातो.
२६२दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे.
२६२एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.
२६३पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो.
२६४पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या कल्पनेने जे सुख मिळतेत्या सुखाचे नाव उत्साह !
२६५स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करणाऱ्यांच्या रक्ताशिवाय उभे राहत नाही.
२६६अन्याय आणि अत्याचार ह्याला सक्त विरोध हाच सत्याचा स्वभाव.
२६७चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुध्दीचा विकास एकांतात होतो.
२६८स्वधर्माविषयी प्रेमपरधर्माविषयी आदर आणि अधर्माविषयी उपेक्षा याचाच अर्थ धर्म.
२६९अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !
२७०क्रोध माणसाला पशू बनवतो.
२७१आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतातफक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.
२७२आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.
२७३जे नंतर चांगले वाटतेतेच कृत्य नैतिक  जे नंतर दुःखकारक ठरतेते अनैतिक !
२७४कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागतो.
२७५परमेश्वर ख्रऱ्या भावनेलाच साहाय्य करतो.
२७६भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यातत्याची खपली काढू नये.
२७७माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हाच खरा धर्म.
२७८बोलावे की बोलू नयेअसा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.
२७९शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.
२८०तिरस्कार पापाचा करापापी माणसाचा नको.
२८१आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाहीसुविचार असावे लागतात.
२८२जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.
२८३आपलं जे असतं ते आपलं असतं आणि आपलं जे नसतं ते आपलं नसतं.
२८४जो धोका पत्करण्यास कचरतोतो लढाई काय जिंकणार !
२८५लीनता आणि विनयशिलता या धार्मिकतेच्या दोन शाखा आहेत.
२८६ह्रदये परस्परांना द्यावीतती परस्परांच्या अधीन करू नयेत.
२८७कर्तव्य पार  पाडता हक्कांच्या मागे धावलात तर ते दुर पळतात.
२८८हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपाला की दुःख संपते.
२८९आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
२९०गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
२९१आदर्श गृहिणी ही शेकडो गुरूंहून श्रेष्ठ आहे.
२९२जो त्याग मनापासून केलेला नसतोतो टिकत नसतो.
२९३अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.
२९४तुम्हाला जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना .
२९५ मागता देतो तोच खरा दानी.
२९६चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.
२९७केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.
२९८समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही
२९९भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामयमानाचे गरीब जीवन चांगले.
३००दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे


                                                        ** संकलन **

                                            श्री.अशोक शिंदे
                               नवमहाराष्ट्र विद्यालय खराबवाडी
                  

     

No comments: