Monday, November 14, 2022

श्री अशोक ठाणगे सर यांना "आंतरराष्ट्रीय हिंदी भाषा भूषण " पुरस्काराने सन्मानित

 *श्री अशोक ठाणगे सर यांना  "आंतरराष्ट्रीय हिंदी भाषा भूषण " पुरस्काराने सन्मानित*



खराबवाडी :- नवमहाराष्ट्र विद्यालय खराबवाडीचे हिंदी भाषा विषयाचे शिक्षक श्री अशोक भागाजी ठाणगे सर यांना विश्वस्तरीय हिंदी भाषा विकास, प्रचार, संवर्धन आणि  अनुसंधान कार्यात काम करताना त्यांनी  शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असल्याने त्यांना सन २०२२ मधील आंतरराष्ट्रीय हिंदी 'भाषा भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


दिनांक १ नोव्हेंबर २०२२ रोजी काठमांडू-नेपाळ येथे संपन्न झालेल्या नेपाळ-भारत हिंदी शिक्षक व साहित्यकार संमेलनाचे कार्यक्रमात श्री अशोक ठाणगे सर   यांना संमेलन समिती प्रमुख विजयकुमार तिवारी, केंद्रीय समन्वयक उस्मान मुलानी, स्वागताध्यक्षा नेपाळ डॉ. संगीता ठाकुर, प्रमुख संयोजक कैलास जाधव, प्रमुख संयोजक नेपाळ डॉ. राधेशाम  ठाकूर यांचे हस्ते आंतरराष्ट्रीय हिंदी भाषाभूषण पुरस्कार देऊन येथोचित सन्मानित करण्यात आले.


नवमहाराष्ट्र विद्यालय खराबवाडीचे शिक्षक श्री अशोक ठाणगे सर यांचे हिंदी भाषेवर प्रभुत्व  आहे.तसेच त्याना राज्यस्तरीय गोवा येथे " भाषारत्न पुरस्कार" मिळाला. खेड येथे मुख्या ध्यापक संघ यांच्या वतीने पण "आदर्श शिक्षक" पुरस्कर प्राप्त झालेला आहे. सध्या ते खेड तालुका हिंदी संघ चे अध्यक्ष म्हणून काम करतात.

यांना गौरविताना मान्यवर नवमहाराष्ट्र विद्यालय चे  शिक्षक अशोक ठाणगे  यांच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत त्यांना हिंदी भाषाभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले असल्याने त्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री अविनाश कड सर तसेच शाळेचे अध्यक्ष प्रकाश खराबी सचिव गोरक्षनाथ कड   सर्व संचालक मंडळ शिक्षक, सर्व कर्मचारी, पालक, विद्यार्थी आणि खेड  तालुक्यात सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tuesday, November 1, 2022

नवमहाराष्ट्र विध्यालया तील श्री अशोक ठाणगे सर यांना नेपाळ काठमांडू येते भाषा भूषण पुरस्कार प्राप्त

 नवमहाराष्ट्र विध्यालय खराबवाडी चाकण येथील हिंदी अध्यापक श्री अशोक ठाणगे सर यांना अंतरराष्ट्रीय हिंदी भाषाभूषण पुरस्कार


नवमहाराष्ट्र विद्यालयाचे जेष्ठ सहकारी शिक्षक आदरणीय श्री अशोक ठानगे सर यांना अखिल भारतीय हिंदी अध्यापक सभा, भारत सरकार व नेपाळ सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा आंतरराष्ट्रीय हिंदी भाषाभूषण पुरस्कार काठमांडू (नेपाळ) येथे आज दिनांक १ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदान करण्यात आला. 

आपले मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐


नेपाल - भारत हिंदी शिक्षक एवं साहित्यकार सम्मेलन २०२२
या कार्यक्रमासाठी  प्रमुख उपस्तिथी 
* उद्घाटक एवं मुख्य अतिथि

आदरणीय श्रीमान हिरा चंद्रा जी स्वास्थ एवं जनसंख्या मंत्री - नेपाल सरकार

* विशेष अतिथि *

आदरणीय श्रीमान सतेंद्र दहिया

अताशे (हिंदी एवं संस्कृति) भारतीय दूतावास काठमाडौं

* संमेलनाध्यक्ष *

आदरणीय डॉ. मंचला कुमारी झा

केंद्रीय हिंदी विभाग त्रिभुवन विश्वविद्यालय, काठमाडौं

* प्रमुख अतिथि *

आदरणीय श्रीमान- लोकेंद्र सेर्पाली

सेंट्रल कमिटी मेंबर पी.एस.पी, नेपाल

आदरणीय डॉ. नंदलाल चौधरी

संचालक द रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल, नागपूर भारत

आदरणीय श्रीमान प्रभाकर ढगे

संपादक - इन गोवा २४ x ७ न्यूज चॅनल गोवा भारत

आदरणीय श्रीमान. ओमप्रकाश क्षत्रिय

बाल साहित्यकार मध्यप्रदेश भारत

* विशेष निमंत्रित *

आदरणीय श्रीमान विनोदकुमार विश्वकर्मा आदरणीय श्रीमान. अमर विष्ट आदरणीय श्रीमान जिवन वली आदरणीय श्रीमान कमलेश गोसावी


Friday, October 14, 2022

नेपाळ काठमांडू येथील "आंतरराष्ट्रीय हिंदी भाषाभूषण पुरस्कार "श्री अशोक ठाणगे" यांना जाहीर

 नवमहाराष्ट्र विध्यालय खराबवाडी चाकण येथील हिंदी अध्यापक श्री अशोक ठाणगे सर यांना अंतरराष्ट्रीय हिंदी भाषाभूषण पुरस्कार



 अखिल भारतीय हिंदी अध्यापक सभा, भारत सरकार व नेपाल सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने काठमांडू (नेपाळ) येथे 1 नोव्हेंबर ते 3 नोव्हेंबर 2022 रोजी होणा-या हिंदी शिक्षक एवं साहित्यकार संमेलन 2022 च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी नवमहाराष्ट्र विध्यालय खराबवाडी चाकण येथील हिंदी अध्यापक श्री अशोक ठाणगे सर  यांची केंद्रीय समितीने निवड केली असून त्यांना अंतरराष्ट्रीय हिंदी भाषाभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.






यापूर्वी त्यांना गोवा  येथे भाषारत्न पुरस्कार व खेड तालुका मुख्याधापाक संघ यांच्या  वतीने ही आदर्श हिंदी शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यासाठी खराबवाडी शिक्षण  संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश खराबी सचिव गोरक्षनाथ कड  सर्व विश्वस्त संचालक मुख्याध्यापक अविनाश कड सर व सर्व अध्यापक बंधू भगिनींनी व कर्मचारी वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.




Sunday, September 25, 2022

नवमहाराष्ट्र विध्यालय खराबवाडी तील सेवक सुहास पेटकर यांना पुणे जिल्हा स्तरीय आदर्श गुणवंत सेवक पुरस्कार

  पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे जिल्हा गुणवंत पुरस्कार  वितरण झाला


पुणे येथील पद्मावती भागातील अण्णा भाऊ साठे सभागृहात शनिवारी (ता. २४) सकाळी साडेदहा वाजता या पुरस्कारांचे वितरण झाले पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने खेड तालुका मधील नवमहाराष्ट्र विद्यालय खराबवाडी या शाळेतील कर्मचारी श्री सुहास पेटकर यांना  जिल्हा गुणवंत पुरस्कार मिळाला संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर व सचिव प्रसाद गायकवाड उपस्थित होते.


या पुरस्कारच्या कार्य क्रमला शाळेचे मुख्याध्यापक श्री अविनाश कड सर तसेच शाळेचे अध्यक्ष सचिव संचालक 

सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी उपस्तीथ होते

सर्वांनी आदर्श सेवक सुहास पेटकर यांचे अभिनंदन केले





Sunday, September 18, 2022

नवमहाराष्ट्र विध्यालय खराबवाडी तील शिक्षकांना जिल्हा स्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार ...

 नवमहाराष्ट्र विध्यालय खराबवाडी तील श्री अशोक ठाणगे सर व श्री राजेश बोराटे सर या शिक्षकांना जिल्हा स्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला

   


खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर संघ यांच्या वतीने जिल्हा पातळीवर गुणवंत शिक्षक,  पुरस्कार सोहळा 18 सप्टेंबर खेड येथे रिद्धी सिद्धी मंगल कार्यालय आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाला. 



नवमहाराष्ट्र विदयालय खराबवाडी या शाळेतील हिंदी विषय शिक्षक श्री अशोक ठाणगे सर व मराठी विषय शिक्षक राजेश बोराटे सर यांना हा आदर्श गुणवंत  शिक्षक पुरस्कर मिळाला तसेच शाळेचे कर्मचारी सुनील कड यांचा ही सत्कार करण्यात आला . यावेळी शाळेचे  मुख्याध्यापक अविनाश कड  सर तसेच शाळेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव संचालक सर्व शिक्षक शिक्षेकेतर कर्मचारी  यांनी अभिनंदन् केले.

 

यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, पदवीधर आमदार अरुण लाड, क्रीडा अधिकारी, महादेव कसगावडे शिक्षक आमदार आजगावकर, माजी शिक्षक आमदार भगवान आप्पा साळुंखे, जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाताई पानसरे, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, व शरद बुटे पाटील, पिंपरी चिंचवड शिक्षणाधिकारी संजय नाइकडे, ठाणे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, पंचायत समिती सभापती, व सदस्य जिल्हा  .

मुख्याध्यापक संघ अध्यक्ष व सचिव व सर्व सदस्य यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते