नवमहाराष्ट्र विध्यालय खराबवाडी तील श्री अशोक ठाणगे सर व श्री राजेश बोराटे सर या शिक्षकांना जिल्हा स्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला
खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर संघ यांच्या वतीने जिल्हा पातळीवर गुणवंत शिक्षक, पुरस्कार सोहळा 18 सप्टेंबर खेड येथे रिद्धी सिद्धी मंगल कार्यालय आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाला.
नवमहाराष्ट्र विदयालय खराबवाडी या शाळेतील हिंदी विषय शिक्षक श्री अशोक ठाणगे सर व मराठी विषय शिक्षक राजेश बोराटे सर यांना हा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कर मिळाला तसेच शाळेचे कर्मचारी सुनील कड यांचा ही सत्कार करण्यात आला . यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अविनाश कड सर तसेच शाळेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव संचालक सर्व शिक्षक शिक्षेकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन् केले.
यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, पदवीधर आमदार अरुण लाड, क्रीडा अधिकारी, महादेव कसगावडे शिक्षक आमदार आजगावकर, माजी शिक्षक आमदार भगवान आप्पा साळुंखे, जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाताई पानसरे, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, व शरद बुटे पाटील, पिंपरी चिंचवड शिक्षणाधिकारी संजय नाइकडे, ठाणे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, पंचायत समिती सभापती, व सदस्य जिल्हा .
मुख्याध्यापक संघ अध्यक्ष व सचिव व सर्व सदस्य यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते
No comments:
Post a Comment