नवमहाराष्ट्र विद्यालय खराबवाडी मध्ये स्वातंत्र्यदिन साधेपणाने साजरा
खराबवाडी ( ता. खेड ) नवमहाराष्ट्र विद्यालयामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. शासनाच्या आदेशाचे पालन करून सामाजिक अंतर राखून कार्यक्रम संपन्न।
कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावमुळे सोशल डिस्टन्स पाळून विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश कड यांच्या मार्गदर्शनाखाली खराबवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे डायरेेक्टर रघुनाथ खराबी यांनी ध्वज पुजन केले अध्यक्ष शिवाजी कड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
मुख्याध्यापक अविनाश कड यांनी सर्वांनी शासनाचे नियमांचे पालन करावे, स्वतः ची व समाजाची सुरक्षितता बाळगावी, तसेच विद्यार्थी यांनी घरीच राहून ऑनलाईन अभ्यास करून शिक्षण सुरु ठेवा व पालकांनी आपल्या मुलांची व स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या असा संदेश दिला.
यावेळी
सचिव गोरक्षनाथ कड, शाळा समिती अध्यक्ष प्रकाश खराबी संचालक नंदाराम कड काळुराम केसवड शिक्षक प्रतिनिधी अशोक ठाणगे विजय डावरे संभाजी मंमाळे धनंजय पवार राहुल खराबी व शालेचे कर्मचारीउपस्थित होते
No comments:
Post a Comment