विद्यालयात गणेशविसर्जनसाठी कृत्रिम हौद
खराबवाडी : कोविड १९ च्या संकटावर मात करण्यासाठी राज्य शासनाने साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्याची सूचना केली त्या अनुशंगाने नवमहाराष्ट्र विद्यालयात ‘विद्यार्थी विना गणपती ची स्थापना करून सातव्या दिवशी विसर्जन करण्यात आले.
विद्यालयात सातव्या दिवशी गणेश विसर्जन होते, त्यासाठी तात्पुरते कृत्रिम हौद तयार करण्यात आले
करोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घेत सुरक्षित अंतराचे भान ठेवून विघ्नहर्त्यां गणरायाची शुक्रवारी विसर्जन करण्यात आले.शाळेचे मुख्यध्यापक अविनाश कड सर यांच्या हस्ते गणरायाचे पुजा करून विसर्जन करण्यात आले.
मंगलमूर्ती मोरया'चा गजर करीत विद्यालयात काही मोजक्या शिक्षकांच्या उपस्थितीत गणरायाचे विसर्जन करण्यात आले
यावेळी उपस्थित शिक्षक ठाणगे सर पवार सर पवळे सर शिंदे सर गोरे सर कोल्हे सर खराबी सर मेदनकर मॅडम जाधव मॅडम काळे मॅडम धुमाळ मॅडम खराबी मॅडम कर्मचारी पेटकर व गुजर उपस्थित होते.
विसर्जन ची काही चलचित्र 👇👇👇👇👇👇👇
संकलन : अशोक शिंदे