Tuesday, August 30, 2022

श्रावण महिन्यातील ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समारोप किर्तन सेवा ह भ प बोराटे सर यांची श्री नागेश्वर महाराज मंदिर मोशी

 किर्तन अभंग - 

वाचावी झाने श्वरी ! डोळा पहावी पंढरी 

   ज्ञान होय अज्ञाना सी ! ऐसा वर या टिके सी !!


 ह भ प  श्री राजेश बोराटे  सर 
यांची श्री नागेश्वर महाराज मंदिर मोशी


श्री नागेश्वर मंदिर मोशी येथे श्रावण महिना निमित्त . ग्रंथ राज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात पार पडला श्री नागेश्वर भजनी मंडळ - मोशी  आयोजित . मंडळाचे हे 17 वे वर्ष होते , गेली महिनाभर या रे या रे लहानथोर ----- या संताच्या वचनाप्रमाणे जवळ जवळ मोशी व परिसरातील 250 वैष्णव साधकांनी नित्य नियमाने रात्री 8 ते 9 या वेळेत हे पारायण पार पडले,व्यासपीठ चालक म्हणून गेली 8 वर्षा पासून ह.भ.प श्री राजेश बोराटे सर होते   दर वर्षी  श्री नागेश्वर भजनी मंडळ व मोशी  ग्रामस्थांच्या   सहकार्यांने  पारायणाचे नियोजन होते शेवटचे 5 दिवस प्रवचन होऊन वार शुक्रवार दि. 26/08/22 रोजी सायं 5.30 ते 7.30 या वेळेत किर्तन |ने ( ह.भ.प  राजेश बोराटे महाराज यांच्या ) पारायणा ची सांगता झाली  व  सर्वांना अन्नप्रसाद देऊन समारोप झाला 

🙏🙏🙏🌹🌹🙏🙏





*७४. अभंग क्र. ४३१६*

*बोले तैसा चाले I*
*त्याचीं वंदीन पाऊलें ।।१।।*
*अंगें झाडीन अंगण I*
*त्याचें दास्यत्व करीन ।।२।।*
*त्याचा होईन किंकर I*
*उभा ठाकेन जोडोनि कर ।।३।।*
*तुका म्हणे देव I*
*त्याचे चरणीं माझा भाव ।।४।।*

          जो बोलेल तसाच वागेल त्याचे मी चरण वंदीतो. त्याचं अंगण मी हाताने झाडीन, त्याचं दास्यत्व करीन. त्याचा नोकर होऊन त्याच्या समोर हात जोडून उभा राहीन. तुकाराम महाराज म्हणतात बोलतो तसं वागतो तोच देव, त्याच्या चरणी मी नतमस्तक होतो.
       लोकांना फसवण्यासाठी बोलायचं वेगळं पण प्रत्यक्ष कृती मात्र त्याच्या विरुद्ध करायची असं वागणारी माणसं असतात. वैयक्तिक जीवनापासून सार्वजनिक जीवनापर्यंत सर्वत्र अशा प्रवृत्तींचा अनुभव येतो. आजची भारतीय जनता सार्वजनिक जीवनात याचा अनुभव जितक्या प्रखरतेने घेत आहे तसा गेल्या सत्तर वर्षात कधी घेतला नव्हता. हिंदूहित, हिंदुहित करत करोडो हिंदू मातीत घातले. देशप्रेम, देशप्रेम म्हणत जगातली तीन नंबरची अर्थव्यवस्था एकशे पंचेचाळीस क्रमांकावर नेऊन ठेवली. "सबका साथ, सबका विकास" म्हणत विकास केला तो फक्त हम दो हमारे दो" चाच !" दाढी वाढवायची, भगवे कपडे घालायचे, उपवासाची नाटकं करायची, गुहेत जाऊन बसायचं आणि प्रत्यक्षात सत्तेची लालसा इतकी भयंकर की कोणत्याही राज्यात विरोधी सरकारच ठेवायचं नाही. इडी, इन्कमटँक्स, सीबीआय, न्यायालयं सर्व गुलाम करुन बेकायदेशीर पद्धतीने माणसं आपल्याकडे खेचायची. कायदा, नीतीमत्ता, घटना, न्याय सर्व धाब्यावर बसवणारे आव मात्र वैराग्याचा आणतात. सामान्य जनतेला उघड फसवतात. निवडणूकीपूर्वी सैनिकांच्या "वन रँक, वन पेन्शन" आंदोलनाला पाठिंबा देणारे निवडून आल्यावर सैनिकांना पेन्शनच नाकारतात. चार वर्षांनी त्यांची सरळ नोकरीतून सुट्टी करायची योजना आणतात. यांच्या कथनी आणि करणीमध्ये जमीन-अस्मानाचं अंतर आहे. हे बोलतात तसे चालत नाहीत. "चुनावी जुमला" हा एक नवा शब्दप्रयोग त्यातून आज रुढ झाला आहे. यातून समाजाची केवढी फसवणूक होते, किती भयंकर नुकसान होतं? हे पाहिल्यावर तुकाराम महाराजांच्या *"बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाऊले"* याचा अर्थ उमगतो. अशा प्रवृत्ती समाजाच्या सर्व क्षेत्रात असतात. चित्रपटात देशप्रेमाचा अभिनय करणारा नट प्रत्यक्षात कर बुडवतो. समाजसेवक समाजालाच लुटतो. महिलांना आधार देतो म्हणणारे महिलांचं शोषण करतात. बालकाश्रम चालवणारे बालकांचंच शोषण करतात. कामगार संघटना चालवणारे कामगारांनाच दहशत दाखवतात. अशा प्रवृत्ती समाजात नेहेमीच असतात. कोणत्याही भाषेत ज्या म्हणी निर्माण होतात त्या अशा अनुभवांतूनच निर्माण होतात. मराठीत एक म्हण आहे. *"खायचे दात आणि दाखवायचे दात वेगवेगळे असतात.* तोंड उघडल्यावर ज्यांचं प्रदर्शन होतं ते दात अन्न चावायचं काम करत नाहीत. जे खायचं म्हणजे अन्न चावायचं काम करतात ते दात दिसत नाहीत. साधुचा वेष धारण करणारा प्रत्यक्षात डाकू असतो. खऱ्या साधुवृत्तीच्या माणसाला साधुचा वेष करण्याचं नाटक करावं लागत नाही. माणसं असतात वेगळी भासवतात वेगळी! यावरुनच दुसरा वाक्यप्रचार रुढ झाला असावा. *"जसं दिसतं तसं ते नसतं. जसं असतं तसं ते दिसत नसतं. जसं दिसतं तसं ते नसतं म्हणून जग फसतं."* 
       काळ कोणताही असला तरी प्रामाणिकपणा हे मूल्य त्रिकालाबाधित आहे. माणूस आधी स्वतःशी प्रामाणिक असला पाहिजे. माणूस जगाला फसवू शकतो, पण स्वतःला कधीच फसवू शकत नाही. पण काही माणसं निर्ढावलेली असतात. त्यांना लोकांना फसवणं यात काही गैर वाटत नाही. ती चुकीचं बोलतात आणि चुकीचंच वागतात, वरुन निर्लज्जपणे ते सांगतातही. ती खोटं बोलतात आणि खोटंच वागतात. तेही *"बोले तैसा चाले"* असं वागतात. पण अशा दुष्ट, गुंड, भ्रष्ट, व्यभिचारी लोकांना उद्देशून हा अभंग नाही. जगद्गुरू तुकाराम महाराजांसारखी विभूती अशा लोकांना वंदन करील, शरण जाईल याची कल्पांतीही शक्यता नाही. उलट अशा लोकांसाठी तुकाराम महाराज हातात शब्दांचे आसूड घेऊनच तयार असतात. 
      तुकाराम महाराजांच्या काळातही लबाड, ढोंगी भरपूर होते. किंबहुना अशांचीच संख्या जास्त होती. ते लोक मोठमोठ्या तत्वज्ञानाच्या बाता मारायचे, चराचरात ब्रह्म भरलेलं आहे सांगायचे आणि माणसामाणसात भेद करायचे. स्त्रीयांना तुच्छ मानायचे. आपल्यासारख्याच असलेल्या माणसाला तो विशिष्ट जातीत जन्माला आला म्हणून तुच्छ, शूद्र लेखायचे. *खुद्द तुकाराम महाराजांसारख्या महान प्रज्ञावंताला, निष्कलंक चारित्र्याच्या थोर साधुपुरुषाला वारंवार कुणबी म्हणून हिनवलं जात होतं. त्यांना त्यांचा गाथा बुडवायला लावला होता. त्यांचा सातत्याने छळ केला जात होता. त्यांनी हाती घेतलेलं काम सोडून द्यावं, त्यांनी आपलं तोंड बंद करावं, आपल्या लेखणीला कायमचा विराम द्यावा यासाठी सर्व मार्गांनी दबाव आणला जात होता. पण तुकाराम महाराज "जालो जीवांसी उदार । तेथे काय भीडभार ।।" म्हणून भिंतीला पाठ लावून लढतच राहिले.*  
     "जग माया आहे. कितीही कमावलं तरी, इथून वर जाताना सोबत काही नेता येत नाही. इथेच सोडून जावं लागतं. जन्माला येतांना मूठ वळलेली असते, पण जाताना हात सताड पसरलेले असतात. *"मुठ्ठी बांध के आनेवाले हाथ पसारे जायेगा । इस नाचिज दुनियासे तुने क्या पाया क्या पायेगा ।।"* असं म्हणणारे सतत आपल्या झोळ्या भरतच राहतात. त्यांची झोळी कधीच भरत नाही. त्यांची हाव कधीच पूर्ण होत नाही. पण लोकांना सांगतात हा पैसा, अडका, जमिनजुमला सर्व मिथ्या आहे, माया आहे. एकदा एक सद्गृहस्थ भेटले. म्हणाले माऊली माझ्याकडे टू व्हिलरपासून फोर व्हिलरपर्यंत सर्व गाड्या आहेत. माझी गाडी वेगळी, बायकोची वेगळी, मुलांना त्यांच्या त्यांच्या गाड्या आहेत. दोन हजार स्क्वेअर फूटाचा बंगला आहे. शेतीबाडी, बागायती कसलीच कमतरता नाही. मोठा पसारा आहे पण त्यात काही अर्थ नाही. ही सगळी माया आहे. आपण वेळ आली तर पायीही फिरतो. त्यांना विचारलं की ही जर सर्व माया आहे तर जमवली का? आयुष्यभर एवढं जमवलं आणि आता म्हणता की माया आहे. मग वाटून का टाकत नाही. अजूनही तिच्यात कशाला गुंतून पडला आहात? ते म्हणतात, "अहो, मला त्याचं काही कौतुक नाही. आहे म्हणून आहे!" या माणसाला हसावं की रडावं? 
    महाराष्ट्रात सद्या खोके खूप गाजत आहेत. तोंडाने म्हणतात, हिंदुत्वासाठी हे सर्व केलं. इडीच्या डोळ्यावर येण्याइतकं घबाड आयुष्यभर कमवलं तेही काय हिंदुत्वासाठी? दुनियेला दिसतं आहे की आपली कातडी वाचवण्यासाठी, सत्ता आणि मत्ता कमवण्यासाठीच सर्व सुरु आहे. पण बोलणार मात्र हिंदुत्वाच्या गप्पा ! हे व्यक्तिगत पातळीवर असतं तोवर फार नुकसान होत नाही. पण हे जेव्हा सार्वजनिक पातळीवर घडतं तेव्हा ते फार नुकसानकारक असतं. म्हणून प्रामाणिकपणा हे फार महत्वाचं मूल्य आहे.
    *तुकाराम महाराजांना ज्या क्षणी प्रस्थापित पिढीजात सावकारी, त्यातून शोषणातून मिळणारं ऐश्वर्य याचं भान आलं त्याक्षणी त्यांनी आपल्याकडे असलेली गहाणखतं नदीत सोडून दिली.* पण सावकारी बंद केली तरी लोकांना मदत देणं बंद केलं नाही. दुष्काळात सर्व धान्य लोकांना वाटून टाकलं. तुकाराम महाराजांनी संसार सोडला नाही. लोकांना जग माया आहे, धनदौलत माया आहे, तिच्याकडे पाठ फिरवा असं सांगितलं नाही. उलट, *"जोडोनिया धन उत्तम व्यवहारें । उदास विचारे वेंच करी ।।"* असा सल्ला दिला. कष्ट करुन जगायला सांगितलं आणि स्वतः तसेच जगले. *"भिक्षा पात्र अवलंबणे । जळो जिणे लाजिरवाणे।।"* असं सांगणाऱ्या तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवरायांनी आदराने पाठवलेला नजराणासुद्धा, *"सोने आणि माती । आम्हा समान हे चित्ती ।।"* असं म्हणून परत पाठवला आणि *"तुम्हांपासी आम्हा येवोनिया काय । वृथा सीण आहे चालण्याचा ।।"* म्हणून शिवरायांच्या दरबारचं निमंत्रणही नम्रपणे नाकारलं. "इतुकी वर्षे आपले देशी वास्तव्य केले, परंतु आमची दखल घेतली नाही": अशी तक्रार करणाऱ्या रामदासाच्या तुलनेत जगद्गुरू तुकाराम महाराजांचं वैराग्य ठळक उठून दिसतं. 
    *महात्मा गांधीजींनी रात्रीच्या रेल्वे प्रवासात टाँलस्टायचं 'अन टू धीस लाँस्ट' वाचलं आणि सकाळी वार्षिक ७५ हजार पौंडाची प्रँक्टीस सोडून दिली आणि टाँलस्टाय फाँर्म स्थापन करुन कुटुंबासह तिथे रहायला गेले. नंतरच्या काळात गांधीजींनी खाजगी मालमत्ता नावाची गोष्टच ठेवली नाही.* जगद्गुरू तुकाराम महाराज, महात्मा गांधी यासारख्या लोकांना आपल्या तत्वनिष्ठेची जबर किंमत द्यावी लागते. गांधीजींचा मुलगा हरिदास त्यामुळे त्यांच्यापासून कायमचा दुरावला. या दोघांच्या कुटुंबाला त्यांच्या तत्वनिष्ठेची किंमत चुकवावी लागली. *तुकाराम महाराजांचं शेत जप्त झालं, परंपरागत मंदिर त्यांच्याकडून हिसकावून घेण्यात आलं. तुकाराम महाराजांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला देहूतून परागंदा होवून वीस-बावीस वर्षे दूरच्या गावात लपून, छपून रहावं लागलं.* पण ज्यांनी संकुचित कुटुंबाचा परिघ ओलांडलेला असतो ते अशा गोष्टींची तमा बाळगत नाहीत. 
  *संत गाडगेबाबांचं कीर्तन सुरु होतं. बातमी आली. त्यांच्या मुलाचं निधन झालं होतं. दुसऱ्याच क्षणी "असे गेले कोट्यानुकोटी । काय रडू एकासाठी ।।" म्हणून गाडगेबाबांनी कीर्तन सुरुच ठेवलं. तुकाराम महाराज, महात्मा गांधी, गाडगे बाबा 'वसुंधैव कुटुंब' ही कल्पना प्रत्यक्षात जगले.* पण अशी, जसं बोलतात तसं वागणारी माणसं समाजात फार कमी असतात. मोठमोठ्या गप्पा मारायच्या आणि वेळ आल्यावर शेपूट घालायचं, माघार घ्यायची असे लोक चेष्टेचा विषय बनतात. पण काही लोक असेही असतात जे जसं बोलतात तसंच वागतात. आपल्या मूल्यांवर ठाम असतात. त्यासाठी कसलीही किंमत द्यायची वेळ आली तरी माघार घेत नाहीत. लोक काय म्हणतील, आपण जे करतो आहोत त्याचे भावी परिणाम काय होतील, आपल्याला त्याची काय किंमत द्यावी लागेल याचा विचार करून हाती घेतलेलं काम सोडून देत नाहीत.
          *महात्मा जोतीराव फुल्यांनी शिक्षणाची महती सांगितली. त्यांनी मुलींसाठी, अस्पृश्यांसाठी शाळा सुरु केल्या. त्यांनी ते काम बंद करावं यासाठी काही समाजकंटकांनी त्यांच्या वडिलांना भडकावलं आणि महात्मा जोतीराव फुल्यांना घरातून बाहेर काढायला भाग पाडलं. महात्मा फुले आणि सावित्रीमाई नेसत्या वस्त्रानिशी घराबाहेर पडले पण त्यांनी आपलं कार्य थांबवलं नाही. महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीमाई यांनी ब्राह्मण बालविधवा स्त्रीयांसाठी आश्रम काढला. तेव्हा दुष्ट सनातन्यांनी त्यांच्यावर मारेकरी घातले. तरीही महात्मा फुले विचलित झाले नाहीत. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यांसाठी काम सुरु केलं तेंव्हा त्यांची लोकांनी महार शिंदे म्हणून हेटाळणी केली. महर्षी सर्व कुटुंबकबिला घेऊन महार वस्तीत रहायला गेले, पण त्यांनी काम सोडलं नाही. राजर्षी शाहू महाराज यांनी शूद्रातीशूद्रांना आपल्या राज्यात राखीव जागा ठेवल्या. तेंव्हा दुष्ट सनातनी ब्राह्मणांनी छत्रपती शाहू महाराजांच्याही खुनाचे प्रयत्न केले. त्यांच्या मुलीच्या लग्नात बाँम्ब टाकले. पण शाहू महाराज आपल्या कार्यापासून यत्किंचितही विचलित झाले नाहीत.* आपल्या शब्दांमागे कृतीचं सामर्थ्य उभं करणारे खरोखरच फार थोर असतात. अशा लोकांप्रती जगद्गुरू तुकाराम महाराजांना अतीव आदर होता. म्हणूनच त्यांचं दास्यत्व स्वीकारण्याची त्यांची तयारी, म्हणजे त्यांच्यापुढे नम्र होण्याची, नतमस्तक होण्याची तयारी त्यांनी या अभंगातून व्यक्त केली आहे. खरं तर *स्वत: तुकाराम महाराजच ‘बोले तैसा चाले’.. या कोटीचे महापुरुष होते. आपल्या स्वीकृत मूल्यांसाठी त्यांनी अपार छळ, यातना, अवहेलना सहन केली. दु:खितांचं दु:ख हरण्यासाठी, शोषितांचं शोषण थांबवण्यासाठी, लोकांना घातक रूढी-परंपरातून बाहेर काढण्यासाठी, धार्मिक गुलामगिरीत हजारो वर्षांपासून जखडलेल्या समाजाला मुक्त करण्यासाठी, खुळ्या समजुती, आचार-विचार यापासून समाजाची मुक्तता करण्यासाठी जगद्गुरू तुकाराम महाराज प्राण पणाला लावून लढले. माघार घेतली नाही.* म्हणूनच आजही तुकाराम महाराजांचं नुसतं नाव घेतलं तरी हजारो माना नतमस्तक होतात. आपण बोलतो तसं वागलं वागलं पाहिजे हा संदेश तुकाराम महाराजांनी या अभंगातून दिला आहे, तसाच आपल्या जीवनातून दिला आहे. 


Friday, June 17, 2022

नवमहाराष्ट्र विद्यालयात दहावीच्या परीक्षेत विद्यालयाचा निकाल 91.15 टक्के

 नवमहाराष्ट्र विद्यालयात दहावीच्या परीक्षेत  विद्यालयाचा निकाल 91.15 टक्के





खराबवाडी ( ता. खेड ) येथील नवमहाराष्ट्र विद्यालयात दहावीच्या परीक्षेत विद्यालयाचा निकाल 91.15 टक्के लागला आहे. या परीक्षेत विद्यालयातील 329 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 299 विद्यार्थी पास झाले

विद्यालयातील प्रथम पाच क्रमांकाचे गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे : 

नवमहाराष्ट्र  विद्यालय  खराबवाडी 

इयत्ता 10 वी  निकाल 

सन 2021-22 

प्रशालेचा निकाल 91.15%

प्रथम पाच क्रमांक 

1.बच्चे  वेदांत विवेक 95.60%

2.घाडगे  प्रणिता  अप्पाजी 95.20%

3.खराबी  श्रद्धा  विलास 95%

4.बेळंबे अथर्व किरण 94.40%

5. पवार  नंदिनी  ब्रिजेश 92.40%


संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव कड, सचिव गोरक्षनाथ कड, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रकाश खराबी, तंटामुक्ति अध्यक्ष रघुनाथ कड,  संचालक नंदाराम कड ,काळुराम केसवड  सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक अविनाश कड, सर्व शिक्षक व कर्मचारी, पालक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन

Tuesday, July 27, 2021

School e-mail id

 School e-mail id 


नवमहाराष्ट्र विद्यालय खराबवाडी

nmvk7254@gmail.com



नवमहाराष्ट्र इंग्लिश मीडियम स्कूल खराबवाडी


nemsk2019@gmail.com

Monday, October 12, 2020

शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये नवमहाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्याचे यश



पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.५वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षा ८वी 2020 मध्ये नवमहाराष्ट्र विद्यालय खराबवाडी शाळेतील विध्यार्थ्यांचे यश



खराबवाडी : नवमहराष्ट्र विद्यालय खराबवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8 वी  2020 मध्ये यशप्राप्त 

   करून यशाची अखंडित परंपरा राखली आहे.


गुणवंत विद्यार्थी व त्यांना मिळालेले मार्क्स पुढीलप्रमाणे :-

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 81.48%

1) तायडे प्रगती विलास 240

2) पाटील साईकृष्णराज सुनिल 228

3) इंगोले वैष्णवी बाळासाहेब 212

4) सनगरे श्रावणी संतोष 206

उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा निकाल

1) घाडगे प्रणिता आपाजी 206

2) बेळंबे अथर्व किरण 182

3) भाडळे धनश्री गणपत 182

4) बाचणे प्रतिक 172

5) पवार नंदिनी बिजेश 170

6) खेरडे प्रज्ञा नरसिंग 170


*💐💐सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !!*💐💐

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा गुणवंत विद्यार्थी यांना अध्यापण करणारे शिक्षक 

1) धाडगे पुनम दत्तात्रय

2) कड चेतना हनूमंत

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा गुणवंत विद्यार्थी यांना अध्यापण करणारे शिक्षक

1) कड चेतना हनूमंत

2) गाडेकर मनोरमा 

3) काळे कविता प्रकाश

4) हुंडारे सर

5) कर्डीले कविता

शाळेतील सर्व शिक्षक, गुणवंत विद्यार्थी यांचे शाळेचे  मुख्यध्यापक श्री अविनाश कड , संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव कड , सचिव गोरक्षनाथ कड, उपअध्यक्ष हनुमंत कड, संचालक रघुनाथ खराबी, नंदाराम कड, विठ्ठल बिरदवडे,  शाळा समिती अध्यक्ष प्रकाश खराबी , सर्व शिक्षक, पालक यांनी अभिनंदन केले.

                     संकलन-  अशोक शिंदे


Monday, September 28, 2020

"सर" चित्रपटाचा शिक्षकांच्या सत्य परिस्थितीवर आधारित असा Trailer..........

 सर.... सर म्हणजे गलेलठ्ठ पगारघरगाडी या चौकटी पलीकडे नेऊन सोडणारा सिनेमा

गुरुजी प्रोडक्शन निर्मित

प्रणित देशमुख लिखित दिग्दर्शित

Trailer

👇👇👇👇👇




हे ही पहा 👇👇👇👇👇👇👇👇

 मॅडम गीता राणी 👉 खुप छान चित्रपट 👈

 शाळेवर आधारित👇👇👇👇👇👇👇👇👇



Thursday, September 17, 2020

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन


                                                 

➿➿➿➿➿➿➿➿➿



⚜️💥🔫🇮🇳👨🏻🇮🇳🔫💥⚜️


                *१७ सप्टेंबर*

*मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन*


      *आधी जाणून घेऊ मराठवाड्याबद्दल थोडंसं –*


मराठवाडा हा महाराष्ट्रातील वर्तमान प्रशासकिय विभाग असून तो सर्वात मोठा आहे. मराठवाड्याचे क्षेत्रफळ हे 64590 चौ. किमी असून यामध्ये पुढील 8 जिल्हे आणि त्यातील – 78 तालूके व 63 बाजारपेठेची शहरं आहेत.

1)औरंगाबाद

2)नांदेड

3)परभणी

4)बीड

5)जालना

6)लातूर

7)उस्मानाबाद व

8) हिंगोली

 

दक्षिणगंगा गोदावरी ही मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यातून वाहते. जायकवाडी हा सर्वात मोठा महाराष्ट्रातील सिंचनप्रकल्प मराठवाड्यात असून मोठा ऐतिहासिक व धार्मिक वारसा हा मराठवाड्यास लाभलेला आहे.


यामध्ये वेरूळ, अजिंठा जगप्रसिद्ध लेणी, देवगिरी, कंधार किल्ले, हेमाडपंथी मंदिरे, मकबरा, 52 दरवाजे, पानचक्की, 3 जोतिर्लिंग मंदिरे, संतांची भूमी पैठण, तूळजाभवानी मंदिर इत्यादी अप्रतिम संस्कृतीचे दर्शन घडवतात.


*मुक्ती संग्राम आणि पार्श्वभूमी–*

   *'स्वप्ने पडली उष:काळाची*

        *हाती मात्र अंध:कार*

     *देश सारा उजळला जरी* 

   *मराठवाड्याची काजळ रात'*


           दिवस १५ ऑगस्ट १९४७ चा साऱ्या भारतभर स्वातंत्र्याचे पर्व सुरु झाले. परंतु हैद्राबाद संस्थान मात्र अजूनही भारतात विलीन झाले नव्हते. त्यामुळे हैद्राबाद संस्थानात असलेला

 मराठवाडा पारतंत्र्यात होता. 

स्वातंत्र्याचे सुख अनुभवणाऱ्या भारताच्या हृदयावर मराठवाड्याच्या पारतंत्र्याची बोचरी जखम होतीच. परकीय सत्तेविरुद्ध एकत्र येताना भारतीयांनी केलेला नेटाचा

 प्रयत्न  हा कौतुकाचा खराच; पण स्वातंत्र्यानंतरही आणखी एका स्वातंत्र्यासाठी लढा देणं किती क्लेशदायक असेल? हैद्राबाद हे भारतातील एक मोठे संस्थान होते. स्वतंत्र भारतात सामील न होण्याचा निजामाचा अट्टाहास  होता. तेलगु, मराठी, कन्नड भाषिक लोकांचा मोठा वर्ग या संस्थानात होता. निजामाच्या जुलुमी अधिपत्याखाली या प्रांतातील लोकांना कोणतेही राजकीय व नागरी अधिकार नव्हते; म्हणून निजामाविरुद्ध जनमत तयार होऊ लागले. त्यातच  निजामाचे पाठबळ असलेला कासीम रजवी याने आपल्या 'रझाकार' या संघटनेच्या माध्यमातून निष्पाप जनतेवर अमानुष अत्याचार सुरु केले.


*'रण  पेटले पेटले रण*

           *अग्निज्वाला सर्वदूर* 

*अंगार मनामनात* 

                *झुगारु हा अंकुश'*


जनमताचा प्रक्षोभ उसळला. खेडी, शहर, निजामाविरुद्ध खदखदू लागली; आणि याला संघटनात्मक व वैचारिक आव्हान दिल, स्वामी रामानंद तीर्थ यांनी.

    १९३८  मध्ये स्थापन झालेल्या हैद्राबाद स्टेट काँग्रेसकडे याचे नेतृत्व आले. लढा घराघरात 

पोहोचला आणि प्रत्येक स्तरातून मुक्तिसंग्रामाचे सेनानी उभे राहिले. गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव, पुरषोत्तम चपळगावकर, रामलिंग स्वामी, श्रीनिवासराव बोरीकर, 

किशोरभाऊ शहाणे यांनी हे स्फुलिंग चेतवले. या लढ्यात स्त्रियाही काही मागे नव्हत्या. आशाताई वाघमारे, करुनाबेन चौधरी, सुशीलाबेन दिवान यांची नावे आपल्याला घेता येतील. वेदप्रकाश श्यामलाल, गोविंद पानसरे, बहिर्जी शिंदे, श्रीधर वर्तक यासारख्या कित्येक विद्यार्थ्यांनी 'वंदे मातरम' चालवली. निजाम सरकारविरुद्ध आपला रोष  व्यक्त केला.


*'मुक्तीचा आक्रोश आमुचा*

        *स्वातंत्र्य आम्हा पाहिजे* 

*ध्यास एक श्वास एक* 

        *हेच आमुचे ध्येय असे'*


भारत सरकारमध्ये सामील होण्याची तेथील लोकांची तीव्र इच्छा , त्याचे उठणारे तीव्र पडसाद, लोकांवर होणारा अमानुष अत्याचार यासगळ्याविरुद्ध 13 सप्टेंबर १९४८  रोजी भारत सरकारने

 हैद्राबाद संस्थाना विरुद्ध कारवाई केली. इ.स.१२९४ मध्ये मराठवाडा

 इस्लामी राजवटीचा आरंभ झाला. १७ सप्टेंबर १९४८ ला या संस्थानाच्या वीलीनीकरणाने 

त्या राजवटीचा अंत झाला. समान संस्कृती व समान भाषा बोलणाऱ्या आप्तांना लोकशाही राज्यात म्हणजे महाराष्ट्रात 

मराठवाडा विलीन झाला त्यासाठी 1 नोव्हेंबर 1956  या दिवसाची वाट पहावी लागली.

       आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामिरीतून स्वातंत्र्य मिळाले खरे पण हे स्वातंत्र्य अधुरे होते. काश्मिर, जुनागड आणि निजाम संस्थानातील जनता अजूनही गुलामीत होती. मराठवाडा आणि तेलंगणात निजामाची राजवट होती.

 17 सप्टेंबर 1948

 रोजी मराठवाडा निजामाच्या गुलामीतुन मुक्त झाला....! 


*डा.आंबेडकर जी की भूमिका-*

 मराठवाडा के साथ पूरा हैदराबाद संस्थान का दलितवर्ग एक तरफ 

निर्धनता और दूसरी तरफ निजामी अत्याचार,दो पाटों के बीच पिसा

 जा रहा था.निजाम मीर उस्मान

अली खान ने डा.बाबासाहब आंबेडकर को २५ करोड का लालच दिखाकर इस्लाम स्वीकारने का प्रस्ताव भेजा था.यदि दलितवर्ग इस्लाम को ग्रहण करता है तो उन्हें ऊंचे ओहदों पर रखा जाएगा इत्यादि सुविधा देने की बात कही थी. डाॕ.अम्बेडकर ने निजाम के प्रस्ताव को यह कहकर ठुकरा दिया कि,"राज्य के दलित भाई आर्थिक दृष्टी से जरूर निर्धन है लेकिन वे मन से निर्धन नही है. रही मेरे इस्लाम ग्रहण करने की बात मेरे जमीर को खरीदने की ताकत किसी में भी नही है."बाबासाहब

 अम्बेडकर ने १८-११-१९४७ तथा

 २७-११-१९४७ को एक परिपत्र निकालकर जोर-जबरदस्ती धर्मांतरित किये हुये दलितों को आवाहन किया की वे वापस घर आवें.यह पत्र २८नवम्बर के नैशनल स्टैण्डर्ड नामक दैनिक में प्रकाशित किया गया.


हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते . त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.


हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1 कोटी 60 लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर 

निजामाचा सेनापती कासीम 

रझवी याने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु केले. दुस-या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु 

झालेला होता. यांच नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, 

गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्ग काबरा, 

बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.


मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची 

पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर

पुढे आले. मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे 

काशीनाथ कुलकर्णी, मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिध्द झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटश्र्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार , विनायकराव चारठाणकर, विश्र्वनाथराव कातनेश्र्वरकर,

 नांदेड येथील देवरावजी 

कवळे, जीवनराव बोधनकर आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या

 कानाकोपज्यात स्वातंत्र्य संग्राम

 तेजस्वीपणे लढला गेला .

            या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत , गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड, विश्र्वनाथ भिसे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल

 काढणं शक्य नाही.

              निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाले. मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले. चाळीसगावकडूनआलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडेच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वरंगल, बीदर विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले. 15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते.


हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणांगती स्वीकारली आणि

खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला. हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला. हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला.

 

मराठवाडा मुक्तिसंग्रामाला यश प्राप्त होऊन  १७ सप्टेंबर रोजी तब्बल ७० वर्षे पूर्ण होत आहेत. ७० वर्षांपूर्वी १७ सप्टेंबर १९४८ रोजी ‘हैदराबाद पोलीस ऍक्शन’ झाली व हैदराबाद संस्थान देशाचे अविभाज्य अंग झाले. इतकी वर्षे होऊनही मराठवाड्याच्या जनतेच्या मनात अजूनपर्यंत त्याच्या स्मृती जिवंत आहेत.मराठवाडा मुक्तिसंग्रामामुळे स्वातंत्र्याला खर्‍या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले आहे.अन्यथा हैदराबादचा निजाम ‘स्वतंत्र राष्ट्रा’चे स्वप्न बघत होता.

       या संग्रामाच्या उज्ज्वल आणि 

लोकविलक्षण पर्वाच्या आठवणींना उजाळा देताना मुक्ततेनंतर महाराष्ट्रात विलीन होणार्‍या 

मराठवाड्याचा कितपत विकास झाला याचाही गांभीर्याने विचार

 होण्याची आवश्यकता आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्राम हे हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढ्यातील एक उज्ज्वल आणि लोकविलक्षण 

असे पर्व होते. हैदराबादच्या स्वातंत्र्यलढ्याची तुलना स्वातंत्र्यलढ्याच्या कोणत्याही पर्वाशी केली जाऊ शकते, इतका तो गौरवास्पद आहे. असे असूनही या लढ्याकडे उर्वरित जनतेचे फारसे लक्ष जाऊ शकले नाही. कारण हा लढा चालू असताना उर्वरित देश नव्याने जन्मू घातलेल्या स्वातंत्र्याच्या प्रसूती वेदनात पार बुडून गेला होता. १५ ऑगस्ट १९४७ रोजी जरी देश

 स्वतंत्र झाला तरी हैदराबाद 

संस्थानच्या रहिवाशांसाठी किंबहुना मराठवाड्याच्या जनतेसाठी स्वातंत्र्याचा खरा जन्म १७ सप्टेंबर १९४८ रोजी झाला. स्वातंत्र्याच्या जवळपास ११ महिने या संस्थानामधील लोक गुलामगिरीतच होते. त्यांच्यासाठी स्वातंत्र्याची पहाट तब्बल ११ महिन्यांनंतर उजाडली. 


निजामाचा धूर्त डाव होता की,

 १५ ऑगस्ट १९४७पर्यंत हैदराबाद संस्थान हिंदुस्थानात सामील न करता ‘स्वतंत्र राष्ट्र’ म्हणून 

घोषित करायचे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी जरी हिंदुस्थान व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे स्वतंत्र झाली तरी त्या दिवशी कुठेच सामील न झालेले एकमेव संस्थान हे ‘हैदराबाद’ होते. निजामाने २७ ऑगस्ट १९४७ रोजी आपले ‘स्वातंत्र्य’ घोषित केले. तेथील ‘रजाकार’ या दहशतवादी

 संघटनेने हिंदी जनतेवर अत्याचार सुरू केले. मोठ्या प्रमाणामध्ये दडपशाही सुरू झाली. हैदराबाद

 सरकारने हिंदुस्थान सरकारबरोबर ‘जैसे थे’ करार केला होता. त्याचा भंग होऊ लागला. त्यामुळे 

हिंदुस्थान सरकारने १३ सप्टेंबर १९४८ रोजी आपल्या फौजा निजामाच्या राज्यात घुसविल्या. 

घाबरलेला निजाम शेवटी १७ सप्टेंबर १९४८ रोजी संध्याकाळी ५ वाजता हिंदुस्थानी सैन्याला शरण आला.

 निजामाच्या डोक्यातील स्वतंत्र राष्ट्राचे मनसुबे भंग पावले. या लष्करी कारवाईला *‘पोलीस ऍक्शन’* असे म्हणतात. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याद्वारे केली गेलेली ही कारवाई देशाच्या इतिहासात अजरामर ठरली. निजामशाहीचा अंत झाला. तेथील जनता अत्याचाराच्या कचाट्यातून मुक्त झाली.


१ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन महाराष्ट्र राज्याचा भाग झाला....!


*मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन भाषण*


भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, मात्र त्यावेळी 

संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये

 विखुरलेला होता. त्यावेळच्या 565 पैकी 562 संस्थांनांनी स्वतंत्र 

भारतात सामील होण्याची सहमती 

दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते. त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त 

होऊन भारतीय संघराज्यात 

सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती

 संग्राम सुरु झाला होता. 


हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1 कोटी 60 लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर 

निजामाचा सेनापती कासीम रझवी 

याने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु केले. दुसज्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. यांच नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्ग काबरा, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.

मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले.

        मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल 

उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, 

मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिध्द झालेल्या 

बदनापूर तालुक्यातील धोपटश्र्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार , विनायकराव चारठाणकर, विश्र्वनाथराव कातनेश्र्वरकर, नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर आदींच्या रुपाने

 मराठवाड्याच्या कानाकोपज्यात स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला . या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, 

शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत , गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड, विश्र्वनाथ भिसे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले.

 या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल काढणं शक्य नाही. निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून 13 सप्टेंबर 

1948 रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाले. मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या.पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले. चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडेच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वरंगल, बीदर विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले. 15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते. 

हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणांगती स्वीकारली 

आणि खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला.हैदराबाद संस्थानात 

तिरंगा फडकला. हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा  लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला.

  

   *"समोर होता एकच तारा* 

       *अन पायतळी अंगार !"*


  *अशा धेयधुंद भावनांनी ज्यांनी हैद्राबाद मुक्ती लढयासाठी जीवाची बाजी लावून तुरुंगवास भोगला, हौतात्म्य पत्करले. अशा सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सेनानी, वीरांगनाना ही  शब्दरूप आदरांजली.....!* 🙏🙏


       🇮🇳 *जयहींद*  🇮🇳

     संकलन  अशोक शिंदे

   

Monday, September 14, 2020

नवमहाराष्ट्र विद्यालय से सभी को हिंदी दिवस की शुभकामना

 



🙏🙏

🌹 *हिंदी दिवस की शुभकामना* 🌹

   हिंदी दिवस के अवसर पर *हमारे विद्यालय की सिद्धी पाटील इस छात्रा ने किया भाषण जरूर सुनिए* ,

    

🌷 *हिंदी दिवस-14 सप्टेंबर-* 

 *अप्रतिम भाषण (सिद्धी पाटील)* 

👇👇👇👇👇👇👇



👆👆👆👆👆👆👆

 *👍सर्व विद्यार्थ्यांनी ऐकलेच पाहिजे असे भाषण-*...

 *कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेत "हिंदी दिन" साजरा होऊ* *शकला नाही* .म्हणून *सिद्धी पाटील* या *नवमहाराष्ट्र विद्या.खराबवाडी च्या विद्यार्थिनी ने घरीच राहुन "हिंदी दिन" निमित्त सर्वांना शुभेच्छा* दिल्या .

     *तिने केलेले अप्रतिम भाषण अवश्य पहा* 

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

संपुर्ण हिंदी व्याकरण और टेस्ट सोडवा

👉👉


14 सितंबर को क्यों मनाया जाता है 'हिंदी दिवस', जानिए इसकी खास बातें

 

14 सितंबर को पूरे देश में हिंदी दिवस मनाया जाता है। सरकारी विभागों में हिंदी की प्रतियोगिताएं आयोजित की जाती हैं। साथ ही हिंदी प्रोत्साहन सप्ताह का आयोजन किया जाता है। स्कूलों में भी हिंदी प्रतियोगिताएं आयोजित करायी जाती है।

हिंदी भारत में सबसे ज्यादा बोले जाने वाली भाषा है और इसे राजभाषा का दर्जा प्राप्त है। 14 सितंबर 1949 को संविधान सभा में हिंदी को राजभाषा का दर्जा दिया गया था। हिंदी के महत्व को बताने और इसके प्रचार प्रसार के लिए राष्ट्रभाषा प्रचार समिति के अनुरोध पर 1953 से प्रतिवर्ष 14 सितंबर को हिंदी दिवस के तौर पर मनाया जाता है।

1918 में हिन्दी साहित्य सम्मेलन में भारत के राष्ट्रपिता महात्मा गांधी ने हिन्दी भाषा को राष्ट्रभाषा बनाने के लिए पहल की थी। गांधी जी ने हिंदी को जनमानस की भाषा भी बताया था।

इस पर साल 1949 में स्वतन्त्र भारत की राजभाषा के प्रश्न पर 14 सितंबर 1949 को काफी विचार-विमर्श के बाद यह निर्णय लिया गया जिसे भारतीय संविधान के भाग 17 के अध्याय की धारा 343(1) में बताया गया है कि राष्ट्र की राज भाषा हिन्दी और लिपि देवनागरी होगी। क्योंकि यह निर्णय 14 सितंबर को लिया गया था। इसी वजह से इस दिन को हिन्दी दिवस के रूप में घोषित कर दिया गया।

लेकिन जब राजभाषा के रूप में हिंदी को चुना गया और तो गैर हिन्दी भाषी राज्य खासकर दक्षिण भारत के लोगों ने इसका विरोध किया फलस्वरुप अंग्रेजी को भी राजभाषा का दर्जा देना पड़ा।

लेकिन आज के समय में हिंदी भाषा लोगों के बीच से कहीं-न-कहीं गायब होती जा रही है और इंग्लिश ने अपना प्रभुत्व जमा लिया है। यदि हालात यही रहे तो वो दिन दूर नहीं जब हिंदी भाषा हमारे बीच से गायब हो जाएगी। हमें यदि हिंदी भाषा को संजोए रखना है तो इसके प्रचार-प्रसार को बढ़ाना होगा। सरकारी कामकाज में हिंदी को प्राथमिकता देनी होगी। तभी हिंदी भाषा को जिंदा रखा जा सकता है।


                          संकलन ःः अशोक शिंदे


Sunday, September 13, 2020

महाराष्ट्रात शाळा दिवाळीनंतरच, असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले

 महाराष्ट्रात दिवाळीनंतरच शालेय शिक्षणमंत्री विद्यार्थ्यांना व पालकांना  दिलास दिलेला आहे.




मुख्याध्यापकांनी शाळा सुरू करण्यास नकार दिल्याने दिवाळीनंतरच हा निर्णय घेण्यात येईलअसे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले

केंद्र सरकारने 21 सप्टेंबर दरम्यान शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्राला थांबावे लागेल. दिवाळीनंतरच हा निर्णय घेण्यात येईलअसे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. कोरोनाच्या भीतीमुळे मोठा दिलासा मिळतो कारण पालक आपल्या मुलांना वास्तविक शाळेत पाठविण्यास सहमत नाहीत.



21 सप्टेंबरपासून केंद्र सरकारच्या सूचनेनुसार 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू करता येतील कायया प्रकरणाची पाहणी करण्यासाठी शिक्षण विभागाने शुक्रवारी संचालक मंडळाची बैठक बोलावली होती. महाराष्ट्रात कोरोना बळी पडणाऱ्या आणि  वाढती संख्या पाहता एवढ्या कमी वेळात शाळा उघडणे योग्य ठरणार नाहीअसे संस्थाचालकांनी ऑनलाईन बैठकीत सांगितले.

या बैठकीस शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडराज्य शिक्षण सचिव वंदना कृष्णाशिक्षण संचालक दिनकर पाटील,महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाचे उपाध्यक्ष वसंत घुईखेडकररयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटीलयुनिसेफच्या रेश्मा अग्रवाल आणि विविध शिक्षण अधिकारी उपस्थित होते.

२१ सप्टेंबरपासून पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यासही राजी होणार नाहीत कारण ग्रामीण भागात कोरोनाव्हायरस पसरत आहे. निवासी शाळा कोणत्याही परिस्थितीत सुरू करू नयेत. गेल्या वर्षीच्या वेतनावरील अनुदान परत आल्यानंतर सॅनिटायझर्सजंतुनाशक व स्वच्छता किट खरेदीसाठी त्वरित पैसे देण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली.


     सौजन्य.. ठाकरे न्युज

Saturday, August 29, 2020

नवमहाराष्ट्र विद्यालयात पहिल्यांदाच झाले विद्यार्थीविना विसर्जन

 विद्यालयात गणेशविसर्जनसाठी कृत्रिम हौद


खराबवाडी : कोविड १९ च्या संकटावर मात करण्यासाठी राज्य शासनाने साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्याची सूचना केली त्या अनुशंगाने नवमहाराष्ट्र विद्यालयात  ‘विद्यार्थी विना गणपती ची स्थापना करून सातव्या दिवशी विसर्जन करण्यात आले.


विद्यालयात सातव्या दिवशी गणेश विसर्जन होते, त्यासाठी तात्पुरते कृत्रिम हौद तयार करण्यात आले 

करोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घेत सुरक्षित अंतराचे भान ठेवून विघ्नहर्त्यां गणरायाची शुक्रवारी विसर्जन करण्यात आले.शाळेचे मुख्यध्यापक अविनाश कड सर यांच्या हस्ते गणरायाचे पुजा करून विसर्जन करण्यात आले.

मंगलमूर्ती मोरया'चा गजर करीत विद्यालयात काही मोजक्या शिक्षकांच्या उपस्थितीत गणरायाचे विसर्जन करण्यात आले

यावेळी उपस्थित शिक्षक ठाणगे सर पवार सर पवळे सर शिंदे सर गोरे सर कोल्हे सर खराबी सर मेदनकर मॅडम जाधव मॅडम काळे मॅडम धुमाळ मॅडम खराबी मॅडम कर्मचारी पेटकर व गुजर उपस्थित होते.

विसर्जन ची काही चलचित्र 👇👇👇👇👇👇👇

     

                                               संकलन : अशोक शिंदे




Sunday, August 23, 2020

सुरक्षित अंतराचे भान ठेवून नवमहाराष्ट्र विद्यालयामध्ये गणरायाची प्रतिष्ठापना

 शाळेच्या अध्यक्षांच्या हस्ते गणरायाचे पूजन


मोजक्या शिक्षकांच्या उपस्थितीत गणरायाचे पूजन

खराबवाडी = करोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घेत सुरक्षित अंतराचे भान ठेवून विघ्नहर्त्यां गणरायाची शनिवारी प्रतिष्ठापना करण्यात आली.शाळेचे अध्यक्ष प्रकाश खराबी यांच्या हस्ते गणरायाचे पुजन करण्यात आले.

मंगलमूर्ती मोरया'चा गजर करीत विद्यालयात काही मोजक्या शिक्षकांच्या उपस्थितीत गणरायाचे पूजन करण्यात आले. 

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अविनाश कड ,शिक्षक ठाणगे सर डावरे सर, मंमाळे सर पवार सर  शिंदे सर प्रिती मँडम राहुल सर कर्मचारी पेठकर उपस्थित होते.


                                            संकलन

                                           अशोक शिंदे

Tuesday, August 18, 2020

नव महाराष्ट्र विद्यालयात दाहवीच्या मुलांंना गुणपत्रकाचे वाटप

 नव महाराष्ट्र विद्यालयामध्ये दाहवीच्या  मुलांंना  गुणपत्रकाचे वाटप 

खराबवाडी = नवमहाराष्ट्र विद्यालयात सोशल डिस्टन पाळुन विद्यार्थ्यांना गुणपत्रक वाटप करण्यात आले गुणपत्रक हातात घेतल्यानंतर मुलांच्या चेहेऱ्यावर आनंदाचे क्षण दिसत होते

       यावेळी शाळेचे मुख्यध्यापक अविनाश कड यांनी मुलांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या मुलांनी उपस्थिती शिक्षकांना पेढे देले 

       यावेळी शाळेचे शिक्षक ठाणगे सर, तौर सर ,मंमाळे सर पवार सर, पवळे सर, फुंदे सर, खेडकर सर,जाधव मॅडम ,मेदनकर मॅडम उपस्थित होते

                                        संकलन = अशोक शिंदे

Saturday, August 15, 2020

सोशल डिस्टन्स पाळून नवमहाराष्ट्र विद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा

 

नवमहाराष्ट्र विद्यालय खराबवाडी  मध्ये स्वातंत्र्यदिन साधेपणाने साजरा


 खराबवाडी ( ता. खेड ) नवमहाराष्ट्र विद्यालयामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. शासनाच्या आदेशाचे पालन करून सामाजिक अंतर राखून कार्यक्रम संपन्न।   
                                                                                                           
 कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावमुळे सोशल डिस्टन्स पाळून विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश कड यांच्या मार्गदर्शनाखाली खराबवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे डायरेेक्टर रघुनाथ खराबी यांनी ध्वज  पुजन केले अध्यक्ष शिवाजी कड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

मुख्याध्यापक अविनाश कड  यांनी सर्वांनी शासनाचे नियमांचे पालन करावे, स्वतः ची व समाजाची सुरक्षितता बाळगावी, तसेच विद्यार्थी यांनी घरीच राहून ऑनलाईन अभ्यास करून शिक्षण सुरु ठेवा व पालकांनी आपल्या मुलांची व स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या असा संदेश दिला. 
यावेळी
सचिव गोरक्षनाथ कड, शाळा समिती अध्यक्ष प्रकाश खराबी   संचालक नंदाराम कड  काळुराम केसवड शिक्षक प्रतिनिधी अशोक ठाणगे विजय डावरे संभाजी मंमाळे धनंजय पवार राहुल खराबी व शालेचे कर्मचारीउपस्थित होते

Thursday, August 13, 2020

Standard 6 first 3 chapter video मार्गदर्शक= सौ.पुनम धाडगे मॅडम

नवमहाराष्ट्र विद्यालय खराबवाडी


  Online learning platform

मार्गदर्शक= सौ.पुनम धाडगे मॅडम

         Standard 6 first 3 chapter video


क्रमांक

घटकाचे नाव

घटकवरील व्हिडिओ

1

Basic concepts in geometry part 1

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा👈

2

Basic concepts in geometry part 2

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा👈

3

practice set 1

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा👈

4

chapter 2: Angles -part 1

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा👈

5

Angles -part 2

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा👈

6

Angles -part 3

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा👈

7

Angles -part 4

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा👈

8

Chapter 3: Integers -part 1

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा👈

9

Integers- part 2

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा👈

10

Integers- part 3

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा👈

11

Integers- part 4

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा👈